कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात यांना मातृशोक,गं.भा.सिंधूबाई थोरात यांचे निधन







मावळ मराठा न्यूज -राजगुरूनगर, वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील आदर्श माता गं. भा. सिंधूबाई लक्ष्मण थोरात ( वय ७० ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात व शरद महाराज थोरात यांच्या त्या मातोश्री, तर पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या त्या भगिनी होत.
भावपूर्ण श्रद्धांजली
कळविण्यास अत्यंत दुःख होते कि, आमच्या मातोश्री / बहीण गं. भा. सिंधूबाई लक्ष्मण थोरात ( वय ७० वर्षे ) यांचे काल सोमवार, दि. २९/१२/२०२५ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ९.३० वाजता वडगाव पाटोळे येथील स्मशानभूमीत होईल. शोकाकुल : हभप. शरद महाराज थोरात, हभप. भरत महाराज थोरात, हनुमंत ज्ञानोबा देवकर ( भाऊ ), समस्त थोरात, देवकर परिवार आणि आप्तेष्ट



