‘मराठी मानसशास्त्र परिषदेच्या’अध्यक्षपदी प्राचार्य डॉ .नरेंद्र देशमुख यांची निवड








मावळ मराठा न्युज- लोणावळा,मराठी मानसशास्त्र परिषदे’चे ११ वे राष्ट्रीय आणि ३८ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन २६ आणि २७ डिसेंबर रोजी पंचवटी महाविद्यालय, नाशिक येथे संपन्न झाले, या परिषदेमध्ये लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांची या परिषदेचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. लोणावळा महाविद्यालयाच्या विकासाच्या दृष्टीने देशमुख यांची निवड होणे ही अभिमानाची बाब आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. याप्रसंगी यांचा सत्कार उप प्राचार्य विलास पाटील, परीक्षा अधिकारी डॉ. राजेंद्र देवरे प्रा. संदीप पोकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी मराठी मानसशास्त्र परिषदेचे कार्य व तिचे महत्त्व विशद करून परिषदेचा अध्यक्ष म्हणून आनंदी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी डॉ.अमर काटकर, डॉ. नितीन बोडके,डॉ. मल्हारी नागटिळक, डॉ.पवन शिनगारे,प्रा. रंजुबाला चोप्रा,प्रा. संदीप लबडे प्रा. संजय साळुंखे.प्रा. धनराज पाटील इत्यादी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप सोनटक्के यांनी केले. लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



