आनंद महिला मंडल व पुष्कर जैन युवक मंडल लोणावळा यांच्यावतीने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीर

मावळ मराठा न्युज – लोणावळा,प पू श्री आनंद ऋषिजी मां साहब यांचा स्मृति प्रित्यर्थ रक्तदान शिविर व नेत्र तपासणी शिबीर आनंद महिला मंडल व पुष्कर जैन युवक मंडल लोणावळा आधार ब्लड बैंक पुणे व एच व्ही देसाई नेत्र हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने श्वेताम्बर जैन स्थानकात आयोजित करण्यात आले. मागील ३३ वर्षा पासुन रक्तदान,अन्न दान,गौ सेवा,जीव दया जप-तप आदी धार्मिक आयोजन करण्यात येते.रक्तदान शिविराचे उद्घाटन नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे व माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. जैन श्रावक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीषजी पारख यांचा सन्मान अध्यक्ष कांतिलालजी ओस्तवाल यांच्या हस्ते करण्यात आला . या शिबिरात ३७ जणांनी रक्तदान केले रक्तदात्याना ५ लाखाचा अपघाती विमा , प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या . नेत्र तपासणी शिबिरात १५० जणांची तपासणी करण्यात आली,११० जणांना साधना टाटीया यांच्या तर्फे मोफत चश्मा वाटप करण्यात आले. आनंद महिला मंडल अध्यक्ष संगिता भुरट, निर्मला लुणावत,सुमिता लुनावत,सविता भुरट , छाया सोनिग्रा, ज्योती पारख,वंदना ओसवाल, वंदना लुनावत,आशा चोरड़िया, साधना टाटीया यांनी सहकार्य केले. युवक मंडलचे अंकित पारख, निहाल लुंकड़, अमित सांखला यांचे विशेष सरकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन अमृता लुनावत यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page