माजलगावात रुग्णसेवेत आघाडीवर खासगी हॉस्पिटल – स्वच्छतेसाठी घेतला पुढाकार

मावळ मराठा न्युज नेटवर्क – (प्रज्ञा अबनावे) माजलगाव (प्रतिनिधी) : शहरातील रुग्णांना दर्जेदार सेवा देत त्यांच्या जीवाला नवसंजीवनी देणाऱ्या खासगी रुग्णालयाने उपचाराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला आहे. रुग्णालयातून निर्माण होणारा वैद्यकीय कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून ठोस पावले उचलली जात आहेत.
वैद्यकीय कचरा व्यवस्थापन हा सर्वच दवाखान्यांसाठी एक गंभीर विषय असून यासाठी शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम केले जाते. मात्र काही वेळा नगरपालिका पातळीवरील स्वच्छतेच्या यंत्रणेत अडथळे निर्माण होतात. अशावेळी गैरसमज होऊन सामान्य नागरिकांना चुकीचा आभास निर्माण होतो.
संबंधित खासगी रुग्णालयाकडून रुग्णांना स्वच्छ वातावरण, सुरक्षित सुविधा व औषधोपचार पुरवले जात असून त्यासाठी प्रचंड आर्थिक व मनुष्यबळ खर्च केला जातो. कचरा व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन स्वतः पुढाकार घेत आहे.
रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेत कुठलाही तडजोड न करता दर्जेदार उपचार व आधुनिक वैद्यकीय सुविधा देणे हेच या हॉस्पिटलचे ध्येय आहे. त्यामुळे नागरिकांनी नाहक अफवांवर विश्वास न ठेवता डॉक्टर व रुग्णालय प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page