लोणावळा नगरपरिषद व ऑक्सिलियम कॉन्व्हेंट शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ई-कचरा संकलन व जनजागृती मोहीम

मावळ मराठा न्युज -लोणावळा, दि. १९ जानेवारी २०२६ — लोणावळा नगरपरिषद (LMC) व ऑक्सिलियम कॉन्व्हेंट शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक. १९ -०१ -२०२६ रोजी ई-कचरा संकलन व जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरून जुने मोबाईल, चार्जर, बॅटऱ्या, तारा तसेच लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे संकलित केली. तसेच, ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास होणारे पर्यावरणीय व आरोग्यविषयक दुष्परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व नगरपरिषदेच्या वतीने अधोरेखित करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेतर्फे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग व व्यवस्थापनाचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page