हिंदूंची आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांची बकरी ईद दोन्ही सण एकाच दिवशी, हिंदू-मुस्लिम एकतेचे होणार दर्शन


मावळ मराठा न्यूज़ :- गुरुवारी, २९ जून रोजी आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांनी अनेक ठिकाणी असा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे. बकरी ईदला त्यागाचा सण म्हणून देखील संबोधलं जात ईदला कुर्बानी का दयायची? यामागे ही एक कथा आहे अल्लाहने हजरत इब्राहिम कडे त्याच्या सर्वात प्रिय व्यक्तीची कुर्बांनी मगितली असता तेंव्हा त्यांनी क्षणाचा ही विचार न करता आपल्याला सर्वात प्रिय असलेल्या आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी पुढे सरसावला असता अल्लाहने “इब्राहिम” चा मुलगा इसहाक च्या जागी बकरी प्रकट केली व इब्राहिम ला सांगितले की तुझी माझ्यावर निष्ठा बघण्यासाठी मी तुझी कसोटी घेतली व त्यात तू यशस्वी झाला तेंव्हा पासून त्याग आणि समर्पण यांचे प्रतीक म्हणून ईद साजरी केली जाते व अल्लाहला बोकड समर्पित केला जातो,म्हणून आषाढी एकादशीला हिंसा नको, तसेच सामाजिक एकोपा कायम राहावा यासाठी है निर्णय नक्कीच राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल . आषाढी एकादशी हा हिंदूंसाठी विशेषतः वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी बहुतांश सर्वजण आपल्या उपवास करून विठ्ठलभक्ती करत असतात या दिवशी मांसाहर पूर्णपणे टाळला जातो मात्र यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत आहे दरम्यान, या पार्श्वभूमीवर बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्त्वाचा निर्णय अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण पाहायला मिळाले आहे मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या त्याग व समर्पण ची भूमिका व घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.




