*खोपोली नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात स्तनपान सप्ताह साजरा*

मावळ मराठा न्युज -खोपोली, (रायगड) दि. ०५.०८.२०२५ रोजी खोपोली नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात “स्तनपान सप्ताह” साजरा करण्यात आला.या वेळी MGM महाविद्यालय कामोठे येथील इंटर्न डॉ यांनी स्तनपान या विषयी १५ मिनिटाचे नाटक सादर केले व MGM च्या कुलकर्णी मॅम यांनी व नगरपरिषदेच्या डॉ संगीता ठाकूर-वानखेडे यांनी स्तनपान विषयी सविस्तर माहिती उपस्थित गरोदरमाता व इतर सर्व रुग्णांना दिली.या कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषदेचे मा मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांचे मार्गदर्शनाने व एमजीएम कामोठे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोगतज्ञ डॉ सुनीला मॅम व त्यांचे सहकारी डॉ, शितल सिस्टर , विक्रांत यांचे सहकार्याने तसेच इनरव्हील क्लब खोपोली यांचे सहकार्याने सर्व गरोदर मातांना राजगिरा लाडू व फळे वाटप करून कार्यक्रम यशस्वी करणेत आला. इनरव्हील क्लब खोपोलीच्या अध्यक्षा सौ दिना नलिन शहा, सेक्रेटरी सौ मधुमिता संजय पाटील, माजी अध्यक्षा जयश्रीताई कलोशी,सदस्य रमीला पटेल व नगरपरिषदेच्या डॉ प्रियंका वरचाली, इंचार्ज सिस्टर तायडे-कोजगे, सिस्टर गिरी, सिस्टर प्रांजल, शुभांगी, श्वेता, योगेश म्हसे, ऋतुजा फॉर्मासिस्ट, मदतनीस लतिकताई व स्वप्नील,सागर आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page