कोण बाळाभाऊ?कोण ओळखतं त्यांना भाजप मध्यें? एवढा आत्मविश्वास आमदार सुनील शेळके यांच्यात आला कुठून?







मावळ मराठा न्युज- मावळ,लोकसभा, विधानसभा,नगरपरिषदा,महापालिका निवडणुका संपल्या त्यात मावळात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा विजय मिळाला.आता सुरु झालाय जिल्हा परिषद,पंचायत समितीचा महा अखाड़ा. मावळ भाजपचा बालेकिल्ला राष्ट्रवादी ने ताब्यात घ्यायला सुरुवात झाली ती त्यावेळी भाजपवासी असलेले सुनील शेळके यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं, त्यावेळी एका रात्रीत भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेले सुनील शेळके आपल्या मतदार संघात केलेल्या स्वतःच्या विकास कामावर पहिल्यांदा निवडून आले. तेही ९० हजारहुन अधिक मतांनी घवघवीत यश मिळवले त्यावेळी बापू भेगडे यांनी त्यांना कडेवर घेतले होते. आणि आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी त्यांना कडेवर घेतले होते तेच बापू भेगडे सुनील शेळके यांच्या विरोधात उभे होते. आणि भाजपचे बाळा भेगडे यांनी त्यांना पाठींबा दिला तरी सुनील शेळके १ लाखाहुन अधिक मतांनी विजयी झाले. त्यावेळी ह्याच बाळा भेगडे यांनी शेळके यांना भाजप कडून उमेदवारी दिली असती तर आज चा दिवस कोण बाळा भाऊ? हा उगवला नसता, आमदार सुनील शेळके भाजपात होते ते राष्ट्रवादी मध्ये नसते आणि बापू भेगडे यांनी आपला उमेदवारीचा हक्क डावलून सुनील शेळके यांना कडेवर घेऊन जिंकण्यासाठी जीवाचे रान केले. आणि शेळके यांना निवडून आणले. आता तर निवडणूक कशी जिंकायची याची शेळके यांना चांगलीच हातोटी सापडली आहे . तेव्हापासून खऱ्या गर्व,अभिमान, आणि मी सांगेल तसंच आणि मी सांगेल त्यालाच उमेदवारी,आणि दादागिरीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यांच्या यशामागील कारण यात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तयार केलेली सरकारी यंत्रणेसारखी खाजगी समांतर यंत्रणा,जसं राज्यात शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,महसूल विभाग,गृह विभाग अश्या सर्व पातळीवर मिनी मंत्रालय मावळात उभं केले आहे.गोर गरिबांच्या शस्त्रक्रिया साठी शेळके यांचा वेगळा विभाग, शिक्षण साठी काही अडचणी असतील त्या सोडवायला वेगळा विभाग,पोलिसांची भानगड असेल तर त्यासाठी वेगळं आणि महसूल विभागासाठी वेगळी माणसं नेमली आहेत. त्यामुळे जशी सर्व सामान्य माणसांची कामे मोठ्या प्रमाणावर होतात ही एक बाजू जरी चांगली आणि खरी असली तरी दुसऱ्या बाजूला महसूल आणि पोलिसांच्या बाबतीत मोठा हस्तक्षेप होतो तो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा आणि गरीब सामान्य माणसाला त्रास दायक होताना दिसतोय. थोडक्यात काय तर आमदार सुनील शेळके यांच्या आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळेच तळेगाव नगरपालिकेत नगरसेवक, उपनगराध्यक्ष असणारे सुनील शेळके आणि दुसऱ्या टर्म ला देखील मोठ्या मतधिक्क्याने आमदार म्हणून विजयी होतो त्यामुळे कोण बाळा भेगडे,त्यांना भाजपत कोण विचारतं? तसंच भाजप चे किरीट सोमय्या, शिवसेनेचे संजय राऊत देखील किरकोळ वाटायला लागतात. सोमय्या यांनी त्यांची गौण खनिज उत्खनन प्रकरण काढले होते.तर संजय राऊत यांनी बेकायदेशीर संपत्ती प्रकरण बद्दल वक्तव्य केले होते. सुशिक्षित पोलीस अधिकारी आणि तहसीलदार पदावर असणाऱ्या अधिकारी यांना अरेरावीची भाषा जनतेपासून आणि पत्रकार यांचे पासून लपून राहत नाही. असाच आत्मविश्वास आणि नेतृत्वा चा मिजास पुढील पांच वर्ष राहिला तर जनता एवढी दूधखुळी नाही. गर्वाचे घर खाली करायला आणि आत्मविश्वास तोडण्याचा संपूर्ण अधिकार हा मावळ वासियांना आहेच.तो ते नक्की तोडतील.



