अहिंसेचा संदेश देण्यासाठी धावले अडीच हजार नागरीक

चिंचवड (प्रतिनिधी)महावीर जयंती निमित्ताने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन(जीतो)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय “अहिंसा” मॅरेथॉनमध्ये अहिंसा संदेश देण्यासाठी धावले अडीच हजार नागरीक. यावेळी ऑलिंपिकवीर बाळकृष्ण अकोटकर,जीतोचे संस्थापक राजेंद्र जैन,पिंपरी चिंचवड चॅप्टरचे अध्यक्ष मनिष ओसवाल, लेडीज विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना, खजिनदार सीए संतोष संचेती,प्रितेश रांका, जितो अपेक्स सीएफइ च्या मुख्य सचिव तृप्ती कर्नावट जितो चिंचवड पिंपरी विभागाच्या मुख्य सचिव योगिता लुंकडसंयोजक – पूनम बंबजितो युवा शाखेचे अध्यक्ष विशाल सोनीगऱा आणि मुख्य सचिव रोहन जैनक्रीडा संयोजक संकेत जैन, सहसंयोजक – सारिका सोलंकी आणि हर्षा लोडयाआदी उपस्थित होते.दि २ रोजी सकाळी ६ वा चिंचवड पवना नगर येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदान येथून या मॅरेथॉन ला प्रारंभ झाला.बिजलीनगर- भेळ चौक- लाल बहादुरशास्त्री चौक- निगडीतील कृष्णा हॉटेल पर्यंत पुन्हा याच मार्गाने चिंचवड च्या जैन शाळा मैदान या मार्गाने हि मॅरेथॉन संपन्न झाली.१० किमी,५किमी, ३ किमी या तीन गटात हि मॅरेथॉन घेण्यात आली.यावेळी जीतोचे पदाधिकारी उपस्थित होते.अहिंसा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी देशातील ६८ तर विदेशातील जीतोच्या २६ चॅप्टरने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनची गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली.या मॅरेथॉनमध्ये सुमारे दोन हजार हून अधिक नागरीक धावले.सहभागी होणाऱ्या धावपटूना शर्ट,अल्पोपहार देण्यात आला.ऑलिंपिकवीर बाळकृष्ण अकोटकर म्हणाले कि, अहिंसा रन मध्ये सहभागी होणे हि मोठी गोष्ट आहे. जगात शांतात नांदावी प्रत्येकालाच वाटते. जगात शांतता नांदावी असे वाटत असेल तर सर्व धर्मामधील एकत्र येवून विचार होणे गरजेचे आहे. केवळ मॅरेथॉनमध्ये धावू नका तर निरोगी राहण्यासाठी रोजच धावले पाहिजेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page