संजोग वाघेरे पाटील यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्याचा पुसाने गावात मेळाव्यात ग्रामस्थांच्या निर्धार

मावळ मराठा न्युज :- मावळ,आज पुसाने गावात इंडिया आघाडीचा मेळावा,मावळ तालुका राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ,काँग्रेस पक्षा च्या वतीने आयोजित करण्यात आला. ह्या प्रसंगी पवन मावळातील अनेक पदाधिकारी ,शेतकरी बांधव उपस्थित होते.सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेण्यात आला.पुणे जिल्हा शिवसेनेचे संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, महारष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस निखिल कवीश्वर, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख भारत ठाकूर, ज्येष्ठ शिवसैनिक गुरव समाज पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, शांताराम भोते, माजी नगराध्यक्ष राजू गवळी आदी मान्यवर उपस्थित होते .गेल्या १० वर्षात खासदारांनी तालुक्याला किती निधी दिला ?काय विकास कामे केली याचा पाढा उपस्थित शेतकरी बांधवांनी मांडला.मेळाव्यात खासदार विषयी लोकांच्या तीव्र भावना ह्या निमित्ताने दिसून आल्या संजोग वाघेरे पाटील यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आण्याचा निश्चय ह्या निमित्ताने करण्यात आला .पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब यांना फसवणाऱ्या लोकांना आम्ही धडा शिकवू अशा भावना उपस्थितांमध्ये होत्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page