महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोणावळ्यातील डॉ.बी.एन.पुरंदरे बहुविद्यालयाला दूरचित्रवाणी संच भेट



मावळ मराठा न्यूज :- लोणावळा:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ.बी.एन.पुरंदरे बहुविद्यालय,लोणावळा यांना विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाणी संच (टीव्ही) महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या माध्यमातून मावळ तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळसकर तसेच लोणावळा शहर अध्यक्ष भारत रमेश चिकणे व रमेशभाऊ म्हाळसकर यांच्या हस्ते भेट स्वरूपात देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थांचा आनंद द्विगुणित झाला होता. या प्रसंगी लोणावळा शहर प्रवक्ते अमित भोसले, निखिल भोसले, उपाध्यक्ष मधुर पाटणकर,सुनिल भोंडवे,चिटणीस निखिल सोमण,संघटक अभिजित फासगे,निलेश लांडगे,अजिंक्य बोभाटे,गौतम रावळ,रोहिदास शिंदे,आकाश लोंढे आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




