लोणावळ्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद चे झेंडा वंदन नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लोणावळेकर नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या.सदर प्रसंगी मुख्याधिकारी अशोक साबळे,उपनगराध्यक्ष देविदास कडू नगरसेवक नगरसेविका,पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी,विद्यार्थी लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहण नंतर लोणावळा शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात आला.

लोणावळा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे
लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त पावसाळी बंदोबस्तसाठी मदत केल्याबद्दल लोणावळा शहर पोलीस स्टेशन च्या वतीने प्रशस्ती पत्र देऊन स्वयंसेवकांना सन्मानित करण्यात आले.

अग्रसेन सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजीव अगरवाल
लोणावळा नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण संकुल येथे अग्रसेन संस्थेचे अध्यक्ष राजीव अग्रवाल, संचालक रियाज मण्यार, सुनिता अग्रवाल, मधु अग्रवाल,नीलम गुप्ता, गोविंद खंडेलवाल,कर्मचारी वृंद,एकविरा पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.जयवंत देशमुख,ॲड. प्रकाश देवमोरे, साप्ताहिक मावळ नागरिकचे मुख्यसंपादक ॲड. संजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते

लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मॅकडोल, लोणावळा येथे ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे,शहर अध्यक्ष रवीभाऊ पोटफोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोणावळा भाजप कार्यालय येथे अध्यक्ष अनिल गायकवाड,माजी नगरध्यक्षा सुरेखा जाधव,महिला आघाडीच्या अध्यक्षा पारिजाताई भिलारे, सौ.रेश्माताई पाठारे,सौ.रचनाताई सिनकर,सौ.ब्रीन्दा गाणात्रा,चारूताई कमलवार,आशाताई खिल्लारे,सौ.मुक्ता गव्हाणे, सौ.रांगणे,सौ.स्मिताताई भिलारे, सौ.शुभांगी भांगरे, सौ.सुनीता खरपासे,रश्मी शिरसकर,दत्ता भाऊ येवले,विजयजी सिनकर, गिरीश कांबळे, अनिश गणात्रा,रामविलास खंडेलवाल,गणेश साठे,प्रफुल्ल काकडे,सुरेश गायकवाड, अर्जुन पाठारे,बाळासाहेब जाधव, सचिन धोकरिया,प्रकाशजी तांबट, तारासिंघ बोरा, अमित गंधे,नंदू जोशी, शुभम मानकामे, श्रवण चिकणे,हरीशचन्द्रे,संतोष चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.



