एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दिपक हुलावळे तर खासदार सुरेश(बाळ्या मामा )म्हात्रे यांची मुख्य विश्वस्तपदी निवड



मावळ मराठा न्युज :-कार्ला,येथील एकविरा देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षपदी कार्ला येथील दिपक निवृती हुलावळे तर उपाध्यक्ष पदी मारूती देशमुख व सागर देवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर सचिव पदी मुख्य पुजारी नवनाथ देशमुख खजिनदार पदी संजय गोविलकर सहसचिव पदी महेंद्र देशमुख सह खजिनदार पदी विकास पडवळ यांची निवड करण्यात आली. २०२३ पासून दोन सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया चालू होती शनिवारी दोन सदस्यांची निवड पूर्ण करण्यात आली त्यानंतर आज सर्व विश्वस्तांनी सभा पार पडली या सभेत दिपक हुलावळे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची देवस्थानचे प्रमुख विश्वस्त म्हणून निवड करण्यात आल्याचे मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी जाहीर केले. आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी सर्वांची निवड जाहीर करत सर्वांचे अभिनंदन केलेयावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, वेहरगाव सरपंच व देवस्थानच्या विश्वस्त वर्षा मावकर नंदकुमार पदमुले,संतोष मावकर, तानाजी पडवळ, संदीप आंद्रे, शहाजी पडवळ, संतोष राऊत, शांताराम मावकर,पांडुरंग मावकर,भरत येवले,अमोल हुलावळे,राजु हुलावळे सदाशिव सोनार, सुरेश कडू, बाळासाहेब गुंड, प्रशांत हुलावळे, सनी हुलावळे, संतोष हुलावळे, निवृत्ती देशमुख, गणेश देशमुख आदींनी निवनिर्वाचीत अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.गडावर येणाऱ्या भाविकांच्या अडचणी लक्षात घेता प्रथमतः गडावरील प्राथमिक सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष दिपक हुलावळे यांनी सांगितले तर राज्यातून व केंद्रातून देवस्थानासाठी आमदार सुनिल आण्णा शेळकें बरोबर मीही प्रयत्न करून देवस्थानाची ख्याती देशभर करू आणि एकविरा गड व परिसराचा विकास करू असे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले.




