पं.सुरेशराव साखवळकर यांना भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार




मावळ मराठा न्युज – तळेगावच्या नाट्यपरिषदेचे विश्वस्त,जेष्ठ संगीत नाटक अभिनेते व साप्ताहिक अंबरचे संपादक पं.सुरेशराव साखवळकर यांना भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार तर डॉ.मीनल कुलकर्णी यांना बालनाट्य चळवळीतील योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबईचा पुरस्कार तळेगावच्या नाट्यपरिषदेचे विश्वस्त, जेष्ठ संगीत नाटक अभिनेते व साप्ताहिक अंबरचे संपादक पं.सुरेशराव साखवळकर यांना भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार तर डॉ.मीनल दिनेश कुलकर्णी यांना त्यांच्या बालनाट्य चळवळीतील बालरंगभूमीवरील योगदानाबद्दल कालिंदी केळुस्कर पुरस्कृत अ.सी.केळुस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण शनिवार दि.१४ जून २०२५ रोजी यशवंत नाट्यगृह माटुंगा दादर येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत व नाट्यपरिषदेचे विश्वस्त सुप्रसिद्ध अभिनेते मा.मोहन जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे सायंकाळी ४.०० वा. होणार आहे.पं.सुरेशराव साखवळकर यांनी जेष्ठ संगीत नाट्यगायक अभिनेते म्हणून गेली पन्नास वर्षे संगीत रंगभूमी गाजवली आहे. पुण्याच्या बाल गंधर्व रसिक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. संगीत नाट्य रंगभूमीवरील महत्वपूर्ण योगदाना बद्दल त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे डॉ.मीनल कुलकर्णी या तळेगावातील जेष्ठ नृत्यअभ्यासक असून सृजन नृत्यालय तळेगावच्या संस्थापिका व कलापिनी तळेगाव च्या नाट्य विभाग प्रमुख आहेत. त्यांनी ‘अमृत संजीवनी’ व ‘भाग्ये देखिला तुका’ या. नृत्यनाट्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे तसेच कलापिनीच्या बाल नाट्य शिबिराचे २५ वर्षे आयोजन केले आहे. त्यांना बालनाट्याच्या दिग्दर्शनाबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेचे अध्यक्ष मा.सुरेश धोत्रे आणि संचालक मंडळ, कलापिनी तळेगाव आणि तळेगावकर रसिक यांच्या वतीने पं.सुरेशराव साखवळकर आणि डॉ.मीनल कुलकर्णी यांचे मन:पुर्वक अभिनंदन….




