कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना कोल्हापुर येथे “मानवतावादी”पुरस्काराने सन्मानित

मावळ मराठा न्यूज- दि.२५.०१.२०२६ कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना कोल्हापुर येथे “मानवतावादी”पुरस्काराने सन्मानितकोल्हापुर येथे लोकराजे राजर्षी शाहु महाराजांच्या नगरीत ऐतिहासिक दसरा चौकतील मुस्लिम बोर्डींग हॉलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आयोजित अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनाचे अवचित्त साधुन जातीय , वर्गीय ,लैंगिक आणि धार्मिक शोषणप्रकीया गतिमान होत असल्याच्या काळात मानवकेंद्री प्रगतिक विचारप्रकिया विकसित होण्यास सजग वातावरण निर्माण व्हावे.सामाजिक विषमवादी मानवी विभागणीला छेद देण्यासाठी आणि मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातुन मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनेतसेच सामाजीक क्षेत्रात धार्मिक , कला , क्रिडा , पर्यावरन , सांस्कृतिक , आरोग्यविषयक , राजकिय , पत्रकारिता , शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनिय समाजकार्य असल्यामुळे कासारवाडीचे पैलवान काळुराम लांडगे यांना ” सन्मानचिन्ह व भारतीय संविधानातील लोकतंत्र हे पुस्तक कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे कोल्हापुरचे जेष्ठ विधिज्ञ अॅड.विवेक घाटगे , संमेलनाध्यक्ष लातुरचे जेष्ठ साहित्यिक , दिग्दर्शक , आणि निर्माते अॅड.डॉ. रमेश विवेकी, स्वागताध्यक्ष साहित्यिक आणि विचारवंत डॉ.राजेखान शानेदिवाण यांच्या शुभहस्ते ” मानवतावादी राष्ट्रीय पुरस्कार २०२६” बहाल करण्यात आला.यावेळी राज्यातुन आलेल्या एकुण ३० जणांना पुरस्कार देण्यात आले.तसेच एक हजारहून अधिच साहित्यिक , विचारवंत आणि कलावंत उपस्थित होते.यावेळी पुण्याचे मानवतावादी शाहीर शितल साठे ,पुण्याचे मानवतावादी शाहीर सचिन माळी ,जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे ,भारतीय संविधानाचे अभ्यासक अॅड. जयंत जायभावे व मुख्य निमंत्रक व सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख अंतिमा कोल्हापुरकर उपस्थित होते.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लेखक ,कवी श्री.अनिल म्हमाने सर व त्यांच्या टीमने भरपुर प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या वेळी पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक , साहित्यिक व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page