*पिंपरी चिंचवडचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांचा मुंबई येथे ” इंडियन नॅशनल अवॉर्ड २०२६ “पुरस्काराने सन्मान*

मावळ मराठा न्युज -दि.२८.०३.२०२६ नवी मुंबई येथे मराठी साहित्य मंदीर हॉल मध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात छावा शिवकालीन बहुउद्देशिय कलामंच , छावा प्रतिष्ठान यांच्या वतीने समाजामध्ये धार्मिक , सांस्कृतिक , कला , क्रिडा , शैक्षणिक ,पर्यावरण , राजकिय , आरोग्यविषयक , साहित्यिक , पत्रकारिता , सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय सामाजिक कार्य करत असल्यामुळे संस्थेने त्यांची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट समजला जाणारा ” इंडियन नॅशनल अवॉर्ड २०२६ ” हा पुरस्कार सन्मानिय प्रमुख पाहुणे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार मा.कुणालदादा मालुसरे साहेब ,छत्रपती सांभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचे वंशज मा. दिपक राजे शिर्के , मुंबई पोलिस डी.सी.पी.मा.डॉ.राज खतीब सर , आय.पी.एस.अधिकारी मा.दिपक साकोरे साहेब ,सुप्रसिद्ध सिने अभिनेते मा.विजय पाटकर यांच्या शुभहस्ते पैलवान काळुराम लांडगे यांना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्यातुन आलेले एकुण १०१ पुरस्कार्थींचा सन्मान करण्यात आले. यावेळी नवी मुंबईच्या नगरसेविका सौ.वैष्णवी वैभवजी नाईक , युवानेते वैभवजी नाईक , पत्रकार संजय मराठे तसेच नवी मुंबईचे आजी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते भरपुर होते.कार्यक्रमाला पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे संस्थापाक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश व त्यांच्या संपुर्ण टिमने प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page