*पिंपरी चिंचवड शहराचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना मुंबई येथे राज्यस्तरिय”डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६*

मावळ मराठा न्युज – दि.०३.०४.२०२६ ने सन्मानित मुंबई येथे महर्षी दयानंद महाविद्यालय ( एम.डी.कॉलेज ) परळ ( पूर्व ) येथे आशादीप महिला आधार मंच आयोजित लेक लाडकी अभियान , महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी गौरवशाली वर्षानिमित्त राष्ट्रसेवेसाठी कार्यरत सामाजिक , धार्मिक , कला , क्रिडा , आरोग्य , पर्यावरण , पत्रकारिता , राजकिय , सांस्कृतिक , साहित्यिक , शैक्षणिक , सहकार , उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य असल्यामुळे तसेच मानवतावादी विचारांना आदर्श मानुन दैनंदिन जीवनात सामाजिक सलोखा जपत ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने उल्लेखनिय वैशिष्टपुर्ण आणि प्रभावी सेवेमुळे समाजात एक वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे संपुर्ण कार्याची दखल घेत समाजिक क्षेत्रातील अष्टपैलु कासारवाडीचे सुपुत्र *पैलवान काळुराम लांडगे* यांना सर्वोत्कृष्ट समजला जाणारा राज्यस्तरीय *” डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६ “* सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , शाल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या मा.अध्यक्षा *अॅड.निर्मला सावंत – प्रभावळकर ,* डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु , पर्यावरण तज्ञ व संविधान अभ्यासक *प्रा.अक्षयजी आंबेडकर ,* प्रसिद्ध गायक व लोकशाहीर *मा.नंदेश विठ्ठल उमप* यांच्या शुभहस्ते पुरस्कार बहाल करण्यात आलायावेळी मिस महाराष्ट्र विजेती , प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री *डॉ.कॅरेन टेरी रजा ,* आशादीप महिला आधार मंचच्या अध्यक्षा *मा.आशाताई भोईर* उपस्थित होते.कार्यक्रमाला पुरस्कार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते *श्री.सुरज भोईर* व आशादीप महिला आधार मंचच्या सर्व टीमने प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page