पुणे–मुंबई एक्सप्रेस वे वर आडोशी बोगद्याजवळअतिज्वलनशील वायूचा टँकर उलटल्याने १८ ते २० तास वाहतूक कोंडी,लायन्स क्लबने घडवलं मानवतेचं दर्शन

मावळ मराठा न्युज – लोणावळा,पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ अतिज्वलनशील वायूचा टँकर उलटल्याने दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने तब्बल १५ ते १८ तास अडकून पडली होती. या कठीण परिस्थितीत कुटुंबासह प्रवास करणारे नागरिक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या अडचणीत सापडले होते.ही गंभीर बाब लक्षात येताच लायन्स क्लबच्या सदस्या लायन डॉ. सीमा शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने अडकलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी,खाद्यपदार्थ तसेच आवश्यक औषधांची मदत पुरविण्यात आली.मानवतेची जाणीव, सेवाभाव आणि संकटात तात्काळ धावून जाण्याची तत्परता — हेच खरे लायनिझम आहे.या सेवाकार्यात लायन संतोष अगरवाल, लायन गिरीष पारख, लायन पद्मा गुप्ता, लायन स्वरूप सूद, लायन सुमित भदेशिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच परिचारिका विद्या शिंदे, दिपाली सोनवणे व अमरीश जाधव यांनी आपला अमूल्य वेळ देत उल्लेखनीय योगदान दिले.या अचानक उद्भवलेल्या संकटात तत्परतेने व समर्पित भावनेने केलेल्या या अनोख्या सेवाकार्यासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रांत ३२३४ डी२ तर्फे लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page