लोणावळा शहरात मुख्यमंत्री वयोश्री योजना अभियाना’ ची सुरुवात रामनगर भुशी प्रभागातून

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना अभियाना’ ची सुरुवात आज लोणावळा शहरातील रामनगर – भुशी प्रभागात करण्यात आली.या अभियानाचा भाग म्हणून रामनगर येथे विविध कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीदरम्यान कुटुंबीयांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडकी लेक योजना यांसह विविध शासकीय योजनांची विस्तृत माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याविषयी आवाहन केले.यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, महिला आघाडी शहरसंघटिका मनीषा भांगरे, उपशहरसंघटिका आयेशा शेख, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, उपशहर प्रमुख निखिल सोमण, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांच्या माध्यमातून संपूर्ण लोणावळा शहरातील प्रभागात ह्या योजना राबविण्यात येणार आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page