‘*लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा’ तर्फे लोणावळा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७०० हून अधिक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी*






मावळ मराठा न्युज – लोणावळा, लोणावळा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७०० हून अधिक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. समाजसेवेचा वारसा जपत लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने स्थानिक रायवूड इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमांतर्गत शाळेतील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.तज्ञ डॉक्टरांचा सहभागया शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने सर्वांची सखोल तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने:डिस्ट्रिक्ट मेडिकल ॲक्टिव्हिटी चेअरमन लायन डॉ. दिलीप सुराणालायन डॉ. पोपट ओसवाल, लायन डॉ. रितेश खंडेलवाललायन डॉ. लीना पाऊन, डॉ. राजेश मोरेडॉ. प्रकाश पारेख, यांसह लोणावळा-खंडाळा येथील इतर नामवंत डॉक्टरांनी आपली सेवा दिली.मान्यवरांची उपस्थितीया प्रसंगी लायन्स क्लबच्या अध्यक्षा कांता ओसवाल, सचिव निराली नळेकर, खजिनदार अश्विनी कदम, झोन चेअरमन MJF लायन देवल पारेख आणि लायन अभय जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.कृतज्ञता आणि आश्वासनशाळेच्या वतीने प्राचार्य आणि व्यवस्थापन समितीने लायन्स क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले. लायन्स क्लबच्या अध्यक्षा कांता ओसवाल यांनी, “भविष्यातही शाळेला वैद्यकीय क्षेत्रात कोणतीही मदत लागल्यास लायन्स क्लब सदैव तत्पर राहील,” असे आश्वासन यावेळी दिले.



