आई एकविरा देवी नवरात्र उत्सवसाठी एकविरा देवस्थान विश्वस्त मंडळ सज्ज

मावळ मराठा न्युज – कार्ला,सालाबाद प्रमाणे यावर्षीही संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जागृत स्थान असलेल्या वेहेरगाव-कार्ला, लोणावळा येथील श्री आई एकविरा देवीची अश्विन नवरात्र उत्सव सोमवार दि. २२/०९/२०२५ ते गुरुवार दि. ०२/१०/२०२५ पर्यंत मोठ्या उत्साहाने व आनंदाने संपन्न होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून देवीच्या गडावर येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी तसेच सेवा पुरवण्यासाठी एकविरा देवीच्या आशिर्वादाने गडावर पावित्र्य व मांगल्य राखुन भाविकांना सुलभतेने श्री आई एकविरा देवीचे दर्शन व्हावे,तसेच भक्तगणांना सुख,सोयी प्राप्त करून देण्याचा विश्वस्त मंडळ तत्पर आहे.आश्विन नवरात्र उत्सव २०२५ मध्ये ११ दिवस खालिल कार्यक्रम होणार आहेत :-१. पहाटे ५ वा. काकड आरती.२. सकाळी ६ ते ७.३० पर्यंत देवीचा अभिषेक पुजा, देवीला घट बसविणे व त्यानंतर आरती.३. सकाळी ८ ते ११ पर्यंत देवीचा पाठ वाचन करणे.४. दुपारी १२ वा नैव्यद्य.५. सायं ७ वा. उत्तर पुजा, आरती व नैव्यद्य.६. रात्री ७.३० वा. आरती झाल्यानंतर देवीचा जागर (देवीची गाणी व भजन).नवमी – महानवमी होम हवन१. रात्री १२ वा. आरती घेऊन घट उठविणे.२. रात्री १२.३० नंतर महानवमी होमाचा विधी ला सुरूवात.३. पहाटे ३ वा देवीचा अभिषेक पुजा चालू व त्यानंतर आरती.४. पहाटे ५.३० वा. महानवमी होम हवन ची शेवटची सांगता व बलिदान विधी.आश्विन नवरात्र उत्सवानिमीत्त खालिल नियोजनकरण्यात आले आहे :-१. ११ दिवस गडावर अन्नदान व प्रसाद.२. डॉक्टर पथक कार्ला यांचे ११ दिवस आरोग्य सुविधा.३. मोफत पाणी वाटप.४. ११ दिवसात सप्तथती पाठांतर.५. नवमी च्या दिवशी महानवमी होम-हवन.६. संपुर्ण गाभारा स्वच्छता पॉलिश / दागिने पॉलिश / मुखवटा पॉलिश.७. मंदिर व गाभारा फुलांनी सजावट.८. इलेक्ट्रिक सजावट मंदिर व परिसर (लाईटींग).९. होमासाठी मंडप (पत्रा शेड), रेलिंग व्यवस्था.१०. इलेक्ट्रिक लाईटिंग स्ट्रीट, जनरेटर व्यवस्था.११. संपुर्ण भक्तधाम स्वच्छता व लाईटिंग.१२. ११ दिवस भजन, देवीची गाणी.१३. एल.ई.डी स्क्रीन.१४. गडावर दर्शनासाठी रेलिंग व्यवस्था.१५. पोलीस बंदोबस्त साठी पायथा वर स्टेज, खुर्व्या व मंडप व्यवस्था.१६. पायथा व पार्किंग मध्ये शौचालय व्यवस्था.

श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त मंडळश्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे-प्रमुख विश्वस्तश्री दिपक निवृत्ती हुलावळे- अध्यक्ष श्री मारूती रामचंद्र देशमुख-वरिष्ठ उपाध्यक्ष श्री सागर मोहन देवकर- उपाध्यक्ष श्री नवनाथ रामचंद्र देशमुख-सेकेटरी श्री महेंद्र अशोक देशमुख- सहसचिव श्री संजय बाळकृष्ण गोविलकर-खजिनदार श्री विकास काशिनाथ पडवळ- सहखजिनदार सौ पुजा अशोक पडवळ- विश्वस्त

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page