वडगाव मावळ येथे उबाठाची आढावा बैठक संपन्न,आगामी निवडणुकांसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा- सचिन अहिर





मावळ मराठा न्युज – वडगांव,आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परीषद,पंचायत समिती,नगरपरीषद,नगरपंचायत निवडणूकांच्या अनुषंगाने आज शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा.मंत्री.आमदार मा.श्री.सचिनभाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रमुख पदाधिकारींची आढावा बैठक वडगाव मावळ येथे संपन्न झाली.यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख मा.श्री.आदित्यजी शिरोडकर साहेब,मावळ तालुका संपर्कप्रमुख मा.श्री.प्रभाकरजी पवार साहेब,महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख पुणे जिल्हा श्रीमती.शादानभाभी चौधरी,शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक,शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवासेना पुणे जिल्हा अधिकार अनिकेत घुले,महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे,उपजिल्हा संघटिका संगिता ताई सोनवणे,तालुका सल्लागार प्रमुख मारूतीभाऊ खोले,युवतीने सेनेच्या सना चौधरी,अवजड वहातुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने,युवासेना तालुका अधिकारी उमेश गावडे,युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे,मावळ तालुका संघटक अशोक निकम,शांताराम भोते,किसन तरस,तालुका समन्वयक रविंद्र गायकवाड,शोभिनाथ भोईर,भरतभाऊ भोते,मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव,विशाल दांगट,लोणावळा शहरप्रमुख-परेश बडेकर,वडगाव शहरप्रमुख-राहुल नखाते,तळेगाव शहरप्रमुख-शंकर भेगडे,देहुरोड शहरप्रमुख-संदिप बालघरे,लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी जेडी भाऊ,उपशहरप्रमुख नागेश दाभाडे,लोणावळा शहर प्रवक्ते अनिल कडु,लोणावळा शहार सल्लागार रामभाऊ थरकुडे,ज्ञानदेव कदम,विभागप्रमुख क्रिशना शिळवणे,प्रकाश चव्हाण,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,कुणाल सपकाळ,धिरज घारे युवासैनिक सुमित भोसले आदी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.




