कार्ला गावातील शिवमंदीराचा १४ व्वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

मावळ मराठा न्यूज :-कार्ला, दि-:२९ डिसेंबर रोजी गावातील शिवमंदीराचा १४ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,सकाळी सात वाजता शिव भगवानंचा रुद्र अभिषेक करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता ह भ प गणेश महाराज फालके,कामशेट यांची प्रवचन सेवा संपन्न झाली,त्यानंतर दिवाळीत झालेल्या किल्ले स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला, गावातील जेष्ठ नागरीक व महीला भगिनीं यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली,आरती झाल्यावर शिवशंकर तरूण मंडळ,कार्ला ग्रांमस्थ,यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,यावेळी शेकडो भाविकांनी अन्न महाप्रसादाचा लाभ घेतला, यावेळी अन्नदात्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तद्नंतर कार्ला गावातील श्री विठ्ठल रुख्मीणी भजनी मंडळाच्या वतीने हरी जागर करत कार्यक्रमाची सांगता झाली.या संपूर्ण कार्यक्रमचे नियोजन शिवशंकर तरूण मंडळ, कार्ला व कार्ला ग्रांमस्थांनी केले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page