लोणावळ्यातील कैलासनगर विभागाच्या नागरिकांच्या सोयीसाठी नामफलकाचे उद्घाटन

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा शहरातील ‘जी’ वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या कैलासनगर भागात परिसराच्या नामफलकाचे उत्साहात अनावरण करण्यात आले. अनेक दिवसांपासून या भागात अशा फलकाची आवश्यकता व्यक्त केली जात होती, जी आता पूर्ण झाली आहे.हा नामफलक आमदार मा. सुनील अण्णा शेळके यांच्या प्रेरणेतून आणि लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. दिपा मंगेश अगरवाल यांच्या सौजन्याने उभारण्यात आला आहे. नगरसेविका दिपा मंगेश अगरवाल यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसराच्या ओळखीसाठी पुढाकार घेऊन हा फलक लावला आहे.उद्घाटनाच्या वेळी कैलासनगरमधील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भागाचे नाव आता अधिकृत फलकावर झळकल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हा फलक लावल्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना पत्ता शोधणे सोपे होणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील नागरिकांनी नगरसेविक दिपा मंगेश अगरवाल यांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page