बुलढाणा बस अपघाताचं नेमकं कारण काय ? रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? यापासून कसे वाचता येईल?:- सुरेश कदम.


मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, बुलढाणा बस अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे की ड्रायव्हरला आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे किंवा टायर फुटल्याने झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या घटनेनंतर रोड हिप्नॉसिसचीचर्चा सुरू झाली आहे. रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय आणि या पासून कसे वाचता येईल, जाणून घ्या.रोड हिप्नॉसिस म्हणजे काय?रोड हिप्नॉसिस म्हणजेच रस्ता संमोहन. रोड हिप्नॉसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, यावेळी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते की, आपल्यासोबत काय घडतंय.रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात. संमोहनाच्या स्थिती असल्यामुळे डोळ्यांनी जे पाहतो त्याचं मेंदू विश्लेषण करु शकत नाही. रोड हिप्नोसिस हे अनेक वेळा अपघात होण्यामागचं पहिलं कारण मानलं जातं. रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही. आपण किती किमी वेगाने जात आहोत किंवा आपल्या समोरच्या वाहनाचा वेग हे ड्रायव्हरच्या लक्षात येत नाही. अशा स्थितीत सहसा लांबच्या प्रवासादरम्यान घडतात. ड्रायव्हर यामागचं कारण सांगू किंवा घटनेचं विश्लेषण करू शकत नाही.रोड हिप्नॉसिसचं हे लांब प्रवासादरम्यान मोकळ्या रस्त्यांवर घडते. वळण नसलेला रस्ता आणि वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यावर ही शक्यता जास्त असते.रोड हिप्नोसिसपासून स्वतःला वाचवण्यासाठी, वाहन चालवताना दर दोन ते तीन तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमचं मन फ्रेश राहील.लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखं वाटतं आणि चालक फक्त समोर पाहत राहतो. त्याला आपल्या समोर काय घडतंय, हे चालकाला कळत नाही. वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहनांवर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. अशा वेळी गाडी थांबवा.रोड हिप्नोसिस म्हणजेच रोड संमोहन रात्रीच्या वेळी जास्त घडते. यावेळी इतर प्रवासी देखील झोपलेले असल्यास, त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर होते. अशा वेळी चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर २ .५ तासांनी ५ -६ मिनिटे चालावे. जर तुम्ही गाडी चालवताना मधेच ब्ल्ँक होत असाल तर तुमचा प्रवास लगेचच थांबवा. क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन नंतर पुन्हा उत्साहात प्रवास सुरू करा.




