*लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अंध बांधवांसोबत फळं वाटप — महाशिवरात्रीच्या दिवसांचे सेवाभावाचा प्रेरणादायी उपक्रम*

मावळ मराठा न्युज – खंडाळा,श्री रमेशचंद्र पारेख यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त खंडाळा येथील अंधशाळेतील बांधवांमध्ये फळांचे वाटप करून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.या प्रसंगी श्री पारेख यांनी आपल्या दिवंगत पत्नी स्व. इलाबेन यांच्या आठवणींना उजाळा देत,त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम लोणावळा-खंडाळा लायन्स क्लब यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल,विभागाध्यक्ष (झोन चेअरपर्सन) एमजेएफ देवल पारेख,लायन डॉ. पोपट ओसवाल, लायन अभय जैन,लायन अॅड. प्रफुल लुंकड,लायन प्रकाश जैन तसेच नंदकिशोर खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page