समर्थ जनहित फौंडेशन संस्थेच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्याख्यान व चित्रकला स्पर्धचे आयोजन

मावळ मराठा न्यूज:-आकुर्डी,कैलास गणपत कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक ६ जून २०२३ रोजी संध्याकाळी.समर्थ जनहित फौंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्याख्यान व चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कागदपत्रांवर सखोल अभ्यास असलेले इतिहास संशोधक श्री. ज्ञानेश्वर मनोहर पठारे यांनी आपल्या भारदार शैलीतून शिवचरित्र सादर केले. तसेच चिमुकल्यांनी शिवाजी महाराज व मावळ्यांची पारंपारिक वेशभूषा करून,पोवाडे गाऊन, कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच मुलांनी शिवाजी महाराजांच्या काढलेल्या सुंदर चित्रांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुक केले. या कार्यक्रमाला आकुर्डी परिसरातील ज्येष्ठ नागरिक ,महिला सभासद ,बचत गट व लहान मुले यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला .




