लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरणप्रेमी आणि आरोग्यदूत असलेले नंदकिशोर खंडेलवाल यांच्या वाढदिवसानिमित्त १५१ झाडांचे वाटप





मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते,वृक्षप्रेमी आणि आरोग्यदूत असलेले नंदकिशोर खंडेलवाल यांच्या वाढदिवस दिनांक १८ जून रोजी १५१ झाडांचे वाटप करून साजरा करण्यात आला.विश्व हिंदू परिषद लोणावळा चे जेष्ठ कार्यकर्ते सुधीर राईलकर आणि मंगेश तेलंग यांना १०१ झाडे तर ५१ फळ झाडे हिमगिरी ट्रस्ट,आंबेगाव येथे देण्यात आली. या वेळेस सामाजिक कार्यकर्ते श्री दुर्गेश देवकर आणि उषा पंडित यांनी श्री नंदकिशोर खंडेलवाल यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडत राहो अश्या शुभेच्छा दिल्या. १८ जून रोजी श्री राजाजी उर्फ नंदकिशोर खंडेलवाल सदर वृक्ष वाटप करण्यात आले.




