संस्कार शिदोरी आणि योगिता एक काव्य प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मावळ मराठा न्युज -संभाजीनगर चिंचवड – (६ मार्च)जागतिक महिला दिन आणि कवयित्री व शिक्षिका योगिता कोठेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘संस्कार शिदोरी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय काव्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम महात्मा फुले विद्यालय, संभाजीनगर येथे पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा विवेकवादी विचारवंत यांच्या हस्ते झाले, तर साहित्यिक सौ. ललिता सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, डॉ. धनंजय भिसे, पुरुषोत्तम सदाफुले, तुकाराम पाटील, बाबू डिसोजा आणि प्रा. महादेव रोकडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री मराठे, प्रतिमा काळे आणि कविता काळे यांनी प्रभावीपणे केले. दुसऱ्या सत्रात म भा चव्हाण उपस्थितीत राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. शैलेंद्र भास्कर भणगे यांनी भूषवले. या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या नितीन भोसले, प्रतिमा काळे,कविता काळे,राजश्री वाणी मराठे,रेवती साळुंके, रेणूका हजारे,आशा नष्टे, माधुरी वैद्य डिसोजा,आत्माराम हारे ,वैशाली लांडगे,राजेश चौधरी, धनंजय इंगळे, ॲड चंद्रकांत गायकवाड, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब गिरी, राम सर्वगोड, अनिल केंगार,आशा शिंदे, सतीश कांबळे, सुरेश डी पवार ,हेमंत जोशी,चंद्रकांत जोगदंड,सुनिता पडवळ ,अशोक सोनवणे, सुवर्णा वाघमारे, चटणे सुभाष ,जयद्रथ आखाडे, स्नेहा शेखर पाठक,शांताराम सोनार,दत्तू ठोकळे,प्रधान मृणाल,महादेव रोकडे, विलास बाबर,मेहमुदा शेख, रामचंद्र पाचूनकर,राहुल भोसले आदि कविंनी आपल्या उत्कट कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. म भा चव्हाण यांच्या हस्ते योगिता एक काव्य प्रवास या वाढदिवसाच्या शुभेच्छा असलेल्या काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलनाच्या या संगमामुळे साहित्यप्रेमींना एक समृद्ध आणि प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व अनुभवायला मिळाले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page