सारंगी करंजावणे हिने ‘डर्ट ट्रॅक रेस 2026’ या प्रतिष्ठित स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा पुरस्कार पटकावला आहे

मावळ मराठा न्युज नेटवर्क -चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सूस शाखेतील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी सारंगी करंजवणे हिने ‘डर्ट ट्रॅक रेस 2026’ या प्रतिष्ठित स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा पुरस्कार पटकावला आहे. तिच्या या यशामुळे पेरिविंकल स्कूलसह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.मोटरस्पोर्ट्ससारख्या आव्हानात्मक आणि साहसी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत सारंगीने आपल्या जिद्द, मेहनत आणि धाडसाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाची दखल घेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिला विशेष रेडिओ मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या यशाबद्दल बोलताना चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, साहस आणि विविध कौशल्यांच्या क्षेत्रातही आपली प्रतिभा दाखवणे आवश्यक आहे. सारंगीने दाखवलेले धाडस आणि जिद्द ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अशा विद्यार्थ्यांमुळे संस्थेचे नाव अधिक उज्ज्वल होते.”यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनीही सारंगीचे कौतुक करत सांगितले की, “सारंगीची मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न केले तर मोठी यशे मिळवता येतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.सारंगीच्या या उल्लेखनीय यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, तसेच पर्यवेक्षक सचिन खोडके, नेहा माळवदे, स्मिता श्रीवास्तव आणि शाळेतील शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे. याशिवाय तिच्या पालकांचेही मोलाचे सहकार्य आणि पाठबळ तिच्या यशामागे महत्त्वाचे ठरले आहे.सारंगीच्या या कामगिरीमुळे पेरिविंकल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या कर्तृत्वाचा सर्वत्र गौरव होत आहे. शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला .सारंगी चे वडील सचिन करंजावणे प्रसिद्ध बाईक रायडर असून ते अनेक देशात रायडर म्हणून गेलेले आहेत आई उच्च शिक्षित असून एका खाजगी कंपनीत व्यवस्थापिका म्हणून कार्यरत असून त्या मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी चिंचवड शहराच्या शहर अध्यक्षा आहेत

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page