लायन्स क्लब लोणावळा,खंडाळा,टिपटॉप हॉटेल ग्रुप यांचे मार्फत ४०० ब्लॅंकेट व ४०० खजूर पॅकेटचे व ९०० वह्यांचे ग्रँड वितरण



मावळ मराठा न्यूज़ :-मावळ लायन्स क्लब लोणावळा, खंडाळा तसेच टिपटॉप हॉटेल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भांबर्डे येथील संपर्क शाळेत तसेच नांदगाव व भाजे येथील संपर्क बालग्राम आशाघर येथील विविध गोर गरीब ,गरजू , अनाथ मुले याना एका दिवसात तीन सेवा कार्याची आखणी करून सुमारे ४०० ब्लँकेट्स व सुमारे ४०० पॅकेट्स खजूर चे वाटप करण्यात आले. त्याकामी टिपटॉप ग्रुप हॉटेल्स यांच्या वतीने थंडीची चाहूल लागल्याने मुलांना ब्लँकेट्स तसेच पौस्टिक आहार खजुरचे पाकिटे सर्व मुलांना वितरण करण्यात आले. त्यावेळेस टिपटॉप हॉटेल्स ग्रुपचे किरण शाह तसेच त्यांचे सहकारी भारतीबेन, उषाबेन, मंजूबेन, मिनाबेन तसेच लायन्स क्लब लोणावळा , खंडाळाचे अध्यक्ष अँड प्रफुल लुंकड ,सेक्रेटरी विरल गाला, ला. अभय जैन, हिराचंदजी ओसवाल लोणावळा इंडस्ट्रियल इस्टेट चे अध्यक्ष ला.संदीप कोरड, ला.मंगेश कदम, ला.दीपाली गाला तसेच संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.




