सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून चालू आसलेल्या गोधडी बैठकीला यश- डी पी खंडाळे

मावळ मराठा न्युज:- पिंपरी – प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी तसेच प्रश्न समजून घेण्यासाठी गोधडी बैठका चालू केल्या आहेत या बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना यश आलेले आहे.दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत २०२२-२०२३ साली द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या प्रज्ञा विलास सकट या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय, थेरगाव, पुणे ३३ या विद्यार्थिनीला पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सराव करण्याकामी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून सराव प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात यावा. तसेच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या १) प्रज्ञा विलास सगट २) संदेश विलास थोरात (कराटे इंटरनॅशनल दुसरा क्रंमाक) विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात यावा, असे आयुक्तांना ठराव करून क्रीडा विभागाने कळविले आहे. या मुळे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनचा सन्मान होणार असल्याने त्यांचे मनोबल वाढणार आहे.यासाठी पाठपुरावा सकल मातंग समाज समन्वयक युवराज दाखले,पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे, आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे,मा.अध्यक्ष रामदास कांबळे,आबासाहेब मांढरे, पैलवान विठ्ठल शिंदे आदींनी पाठपुरावा केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page