ओवळे गावचे सरपंच-दिलिप नाना शिंदे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित






मावळ मराठा न्युज -ओवळे,मावळ- महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध दै.पुण्य नगरी/ बातमीपत्राच्या परिवाराच्या वतीने ओवळे गावात केलेल्या सामाजिक व विकास कामांची दखल घेत मावळ तालुक्यातील ओवळे गावचे सरपंच -श्री.दिलिपनाना शिंदे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ओवळे गावात शासनाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे सरपंच-शिंदे यांच्या कार्यकाळात मार्गी लागले असून, अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. या काळात त्यांनी गावातील अंतर्गत रस्ते करणे,गावातील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देणे,तसेच गावच्या विविध सामाजिक कार्यासाठी स्वतःच्या खिशातुन लाखो रूपये खर्च केले आहेत.या सर्व कामांची दखल घेत शिंदे यांना दै.पुण्य नगरी परिवाराच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अशी माहिती ओवळे गावचे सा.कार्यकर्ते – शिवभक्त अजित भाऊ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.




