*लायन्स क्लब लोणावळा,खंडाळा व डेला अ‍ॅडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीर संपन्न*

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब लोणावळा खंडाळा व डेला अ‍ॅडव्हेंचर यांच्या संयुक्त उपक्रमाने १८५ रक्ताच्या बाटल्याचे संकलित केल्या,तसेच ३०० व्यक्तींचे डोळ्यांची तपासणी करण्यात आली. लायन्स क्लब लोणावळा खंडाळ्याच्या व डेला अ‍ॅडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने गत वर्ष प्रमाणे १२ ऑगस्ट २०२५ रोजी डेला रिजॉर्टचे जिमी मिस्त्री यांच्या पुढाकाराने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजनाचे औचित साधून समाजातील ह्या गरजांकडे लक्ष वेधले गेले. रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता व दैनंदिन धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, या उपक्रमाचा महत्त्व अधिकच वाढला आहे. या शिबिरात एकूण १८५ पेक्षा व्यक्तींनी रक्तदान केले, तर सुमारे ३०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. रक्तदात्यांना आवश्यक असलेल्या रक्ताचा साठा सुनिश्चित करण्यासाठी आधार ब्लड बॅंककडून १८५ बाटल्यांचे संकलन करण्यात आले. या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतलेल्या लायन्स क्लब सदस्यांमध्ये अध्यक्ष लायन कांता ओसवाल, सचिव लायन निराली नालेकर, डिस्ट्रीक्ट रक्तदान अध्यक्ष डॉ. दिलीप सुराणा, डिस्ट्रीक्ट वैद्यकीय उपक्रम अध्यक्ष डॉ. पॉपट ओसवाल, तसेच विरल गाला, दीपाली गाला, अडव्होकेट प्राफुल लंकड, अडव्होकेट संगिता लंकड, जयश्री सुराणा, जूबेरभाई व साजिया शमशी, प्राकाश जैन, अडव्होकेट राजू शिंदे, अभय जैन, राजूभाई, रोहित थोरात, नंदकिशोर खंडेलवाल डेल्ला रेसॉर्ट व्यवस्थापन विशेष सहकार्य लाभले फ्रान्सिस रॉड्रिग्ज, रवीश देसाई, धनाजी पांडे, आशिष शर्मा, कुणाल झुरे व टीम श्री. जिमी मिस्त्री श्री. इरफान झाफर, यांचा सहभाग लाभला व प्रत्येक रक्तदात्यांना १ वर्षासाठी ५ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षणही देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान मिळेल व आरोग्याची काळजी घेण्याच्या आवाहनाची गरज अधिक तीव्रपणे जाणवली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page