पिंपळे गुरव येथे पाण्याअभावी झाडे जळाली उद्यान विभाग सुस्त, अधिकारी मस्त

मावळ मराठा न्युजनेटवर्क -पिंपळे गरव येथील रामनगर वरून सीएमई सैन्य दलाच्या सीमेला लागून जाणाऱ्या रस्त्यावर ब्लू डार्ट ते मयुर नगरी चौक फूटपाथवर ५ फुटांपासून ते १५ फुटापर्यंत पूर्ण क्षमतेने वाढ झालेली पाण्याअभावी झाडे जळून गेली आहेत, शहरात वृक्षगणनेनुसार ३२ लाख झाडे असल्याचा दावा पालिकेने केला आहे तर दुसऱ्या बाजूला पाण्याअभावी जवळपास २५ पूर्ण वाढ झालेली झाडे जळाली आहेत .सध्या शहराचे तापमान वाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत ,पालिका मात्र लाखो झाडे लावल्याचा दावा करते पण वाढलेली झाडे जगवता येत नसतील यापेक्षा काय दुर्दैव नागरिकांचे आहे असे सांगण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे.फुटपाथ विकसित करताना झाडाच्या बुंध्याच्या खाली सिमेंटचे आवरण दिलेले आहे त्यामुळे झाडे मोठी झाल्यावर मुळ्या खोलवर जात नाहीत आणि पाणीही मिळत नाही आणि मातीपण कमीच राहते त्यामुळे झाडे जळतात  एकीकडे शासन म्हणते “झाडे लावा, झाडे जगवा”असे  सांगते आणि स्वतः  लावलेली झाडे जाळते असा उद्दीग्न प्रश्न मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केला आहे .आजचे पर्यावरण वृक्षारोपण, संरक्षण,म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय हे फक्त सांगण्यापुरतेच राहिली की काय असा प्रश्न मला पडल्याचे जोगदंड यांनी सांगितले.उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो उघडा डोळे, बघा नीट आणि झाडांचा जीव वाचवा. झाडे जळाल्याचे कळल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे वृक्षमित्र अरुण पवार यांनी टँकरने पाणी देण्याचे आश्वासन दिले आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मला फोन करा मी टँकर तुम्हाला उपलब्ध करून देईल अशी आश्वासन आम्हाला दिले. यावेळी अधिकारी फक्त सांगतात की माहिती घेतो, सांगतो, कारवाई करतो असे सांगून वेळ मारून घेतात  अशा कामचुकार अधिकारी व ठेकेदारावर यांच्यावर कोणाचा वरद हस्त आहे असा प्रश्न मला पडत असल्याचे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ संगीता जोगदंड यांनी केला आहे. यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड ,महिला शहराध्यक्षा संजना करंजावणे ,उपाध्यक्ष  काळुराम लांडगे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सचिव गजानन गजानन ,कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांच्या निवेदनावर सह्या आहेत.सामाजिक कार्यकर्ते अरविंद मांगले ,जालिंदर दाते, संजय कांबळे ,गणेश वाडेकर, पंडित वनस्कर,रितेश वनस्कर,महेश राऊत,उपस्थित होते. या संस्थेच्या वतीने सर्व वाळलेल्या झाडांची फोटो काढून आधिक्षक महेश गारगोटे यांना संस्थेचे पदाधिकारी यांनी दिला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page