किनारा वृद्धाश्रम येथील वृद्ध,महिला व पुरुष यांच्यासाठी पॅन्ट, शर्ट ,साड्या ,स्वेटर व ब्लॅंकेट, वस्त्रदान

मावळ मराठा न्यूज़ :-पिंपरी(प्रतिनिधी) वाल्हेकरवाडी येथील गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अहिरवडे कामशेत येथील किनारा वृद्धाश्रम येथील वृद्ध महिला व पुरुष यांच्यासाठी पॅन्ट शर्ट ,साड्या ,स्वेटर व ब्लॅंकेट वस्त्रदान करण्यात आले. यावेळी व्यावसायिक आदेश नवले , तुळशीराम (मामा) देसले, खांदेश मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटील, उद्योजक भास्कर पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील, सिद्धेश्वर ठाकरे, समाधान सोनवणे या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले असून पण प्रत्यक्ष कार्यक्रमाला देखील हजर होते. गुलाबराव पाटील आदेश नवले यांनी आश्रमास आर्थिक मदत देखील केली. व्यवस्थापकीय संचालिका प्रीती वैद्य म्हणाल्या कि, ऐन पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही वृद्धांसाठी खूपच मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल आयोजकांचे व ऊपस्थितांचे मनापासून कौतुक केले. व पुढील कार्यास किनार आश्रमाच्या वतीने व त्यांच्या परिवाराच्या वतीने भरभरून शुभेच्छा दिल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page