लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा ला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांची भेट व महिला दिन उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांची अधिकृत भेट तसेच महिला दिनाचा विशेष कार्यक्रम प्रेसीडेंट लायन कांता ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात मिस्टी ब्लू रिसॉर्ट येथे उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्राने लायन चार्मी पारेख यांनी केली, तर गणेश वंदना कुमारी स्वरा मराठे यांनी सादर केली.महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कुमारी आकांक्षा शेवाळे (स्टेट गोल्ड मेडलिस्ट) यांनी सादर केलेल्या झुंबा सत्रात सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच श्रीमती मंजुषा मराठे (शौर्य फाउंडेशन) यांनी महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करून उपयुक्त टिप्स दिल्या. महिला सदस्यांसाठी विविध खेळांचे आकर्षक आयोजन लायन निराली नाळेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लायन निराली नाळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन लायन सागर लुनावत यांनी केले.या कार्यक्रमाला क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रेसीडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, झोन चेअरपर्सन एमजेएफ लायन देवल पारेख तसेच सर्व माजी अध्यक्ष यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या हस्ते ‘लायन्स पिन’ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लायन्स इंटरनॅशनलच्या भविष्यातील योजनांवर (फ्युचर प्लॅनिंग) भर देत सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी मानसिक आरोग्य, भूक निर्मूलन (हंगर) आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवरही सविस्तर मार्गदर्शन केले.शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान प्रेसीडेंट लायन कांता ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page