तळेगाव येथील कलापिनी बालभवनमध्ये “दिप उजळवून दिप अमावस्या साजरी”

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज – तळेगाव,कलापिनी बालभवन मध्ये दिप अमावस्येनिमित्त विविध प्रकारच्या दिव्यांची आरास करण्यात आली होती. सुरवातीला बालभवनच्या बालचमुंनी प्रसन्न वातावरणात रोजचे श्लोक म्हटले. त्यानंतर मुलांना मधुवंती रानडे यांनी दिप अमावस्या साजरी करण्यामागचे महत्त्व सांगितले. मीरा कोण्णूर यांनी जुन्याचा हात न सोडता आधुनिकतेची जोड देऊन दिव्याच महत्त्व सांगणारी छान गोष्ट सांगितली व दिव्याचा प्रवास सांगणारे गाणे ही सांगितले.कार्यक्रमा साठी कलापिनीचे विश्वस्त शिरीष जोशी उपस्थित होते. त्यांच्या मनोगतात त्यांनी बालभवन मधे होणा-या या उपक्रमाचे कौतुक केले व दिव्याची अमावस्या अशी कुठे साजरी केलेली आपण पाहिली नाही असही ते म्हणाले. त्यांनी त्या बद्दल सर्व प्रशिक्षिकांचे कौतुक केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सर्व प्रशिक्षिकांनी केले.समारोप श्लोक म्हणून झाला. शेवटी सर्वांना प्रसाद देण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page