जितेंद्रभाई कल्याणजी अंबरचा शैक्षणिक आणि सामाजिक पुरस्काराने सन्मानित







मावळ मराठा न्युज – लोणावळा,साप्ताहिक अंबरच्या ३६ व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते जितेंद्र कल्याणजी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोणावळा नगरपरिषद शिक्षणमंडळाचे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र धीरूभाई कल्याणजी यांना नुकताच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कर्तव्यभूषण प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साप्ताहिक अंबरचे मुख्य संपादक सुरेश साखळकर, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, डॉ. सुनील तांबे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाई मेहता, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळुंज, लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, साप्ताहिक अंबरचे संपादक अतुल पवार, सहसंपादक प्रशांत पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.जितेंद्र कल्याणजी हे मावळ वार्ता फाउंडेशनचे देखील माजी अध्यक्ष आहेत.गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे याकरता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. धीरूभाई कल्याणजी यांनी फिरती शाळा सुरू करत लोणावळा शहरामध्ये कामानिमित्त स्थलांतरित होऊन येणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याच वडिलांच्या आदर्शवर जितेंद्र कल्याणजी यांचे देखील शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. नगरपरिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना खाजगी शाळा प्रमाणे शिक्षण व गणवेश मिळावेत याकरिता त्यांचे सतत प्रयत्न असतात .



