लोणावळा ग्रामीण पोलिसांची हप्तेखोरी आणि दांडूकेशाहीचा मनमानी कारभार वाकसई येथील हॉटेल दौलत ईनच्या माध्यमातून आला समोर







मावळ मराठा न्युज – लोणावळा ग्रामीण पोलीस हद्दीतील वाकसई येथील दौलत हॉटेलवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी यात अवैध बेकायदेशीर दारूविक्री कामी वैयक्तिक लाभाकरिता हप्ता वसुली पोलिस अधिकारी नामे गौरव तळपे व पोलिस अधिकारी नामे अजय देवकाते यांनी दि.२१/०९/२०२६ रोजी रात्री ११.३० वा च्या सुमारास दौलत हॉटेल इन या हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायावर कारवाई करण्यात आली.त्यात वरीष्ठ पोलिस अधिकारी यांचे नावे अवैध दारू विक्री वसुली कामी नेमणुकीस असलेले पोलिस अधिकारी नामे गौरव तळपे यांनी नियमित हप्ता रक्कम रु ७०००/- सात हजार प्रतिमहा ठरवुन मला सदर व्यवसायाच्या जागी अवैध दारू विक्रीकामी प्रोत्साहित केल्याने दर महीन्याच्या दहा तारखेच्या दरम्यान माझे कडुन नियमित हप्ता जमा करण्यात येत होता असेही हॉटेल मालक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.शिंदे यांनी अधिकारी अजय देवकाते यांनी कंबरेला रीवाल्वर लावली आणि घाण घाण शिव्या देऊन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि सदर झालेल्या मारहाणी आणि शिवीगाळ चा पुरावा राहू नये म्हणून सीसि टीव्ही पूटेज चा संबधीत पोलिसांनी दि.२२/०९/२०२६ रोजी रात्री ०१.०० वाजण्याचा सुमारास माझे मालकीच्या मिळकतीत हॉटेल दौलत इन मध्ये अनाधिकाराने बेकादेशीर रितीने घुसखोरी करून सदर डी.व्ही.आर संचाची हार्ड डिस्क ताब्यात घेऊन संबधीत मारहाणीचे रेकार्डडींग ताब्यात घेतले असुन, माझे विरोधात खोट्या आशयाची तक्रार दाखल करून, तुरुगांत टाकण्याची धमकी दिली असल्याचे हॉटेल मालक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अवैध धंद्यातुन हप्ताखोरीच्या वादातुन सदर कारवाई सुडबुध्दीने करण्यात आली असुन, सदर वर नमुद पोलिस कर्मचारी यांनी ९ कामगार, माझा मुलगा नामे शुभम शिंदे तसेच मावसभाऊ ओम सुनिल शिंदे यांनी हप्ताखोरीच्या वादातुन मारहाण करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या कडे तक्रार
याबाबत हॉटेल मालक जगन्नाथ पंढरीनाथ शिंदे यांनी सदर लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या दांडूकेशाही,हप्तेखोरी आणि दादागिरी संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या कडे तक्रार केली आहे. झालेल्या तक्रारीबाबत संदीप गिल यांचेशी संपर्क केला असता आलेल्या तक्रारी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. सलग ९ वर्षे बेकायदेशीर दारू विक्री करत होतो आणि महिना ७ हजार हप्ता देत होतो. असं अचानक काय झाले हप्ता देऊन रात्री रेड टाकून कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली.गांजा,चरस अफिंग आहे का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना विचारून मारहाण करण्यात आल्याने करून जबरदस्ती घुसून बंदुकीच्या धाक दाखवून देवकाते यांना काय हवं होतं हे समजण्याच्या पलीकडे असल्याचे हॉटेल मालक जगन्नाथ पंढरीनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मी बेकायदेशीर दारू विकली हा गुन्हा मी केला त्याबाबतच कारवाई व्हावी,जप्त केलेला माल नेला मान्य पण मारहाण करणं,कोणताही अधिकार नसताना रात्री ०१.०० वाजण्याचा सुमारास माझे मालकीच्या मिळकतीत हॉटेल दौलत इन मध्ये अनाधिकाराने बेकादेशीर रितीने घुसखोरी करून सदर डी.व्ही.आर संचाची हार्ड डिस्क ताब्यात घेऊन संबधीत मारहाणीचे रेकार्डडींग ताब्यात घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवाल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.



