*मावळ कन्येची नेत्रदीपक कामगिरी;मानसी जाधव ‘सस्टेनेबल एनर्जी टेक्नॉलॉजी’ विषयातील एमटेकमध्ये टॉपर*

मावळ मराठा न्युज लोणावळा: दि. २२ (प्रतिनिधी)तळेगाव दाभाडे येथील मावळ कन्या मानसी विजय जाधव हिने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), हैदराबाद येथून ‘सस्टेनेबल एनर्जी टेक्नॉलॉजी’ विषयातील एम.टेक. पदवी ९+ सीजीपीएसह पूर्ण करत एम.टेक.मध्ये टॉपर होण्याचा मान मिळविला. सावित्रीबाईच्या या लेकीच्या नेत्रदीपक यशामुळे मावळच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील उच्च शिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) येथे तिची निवड झाली आहे.आयआयटी हैदराबादच्या दीक्षांत समारंभात संचालक प्रा. बी. एस. मूर्ती यांच्या हस्ते मानसीला सन्मान व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. बी. व्ही. आर. मोहन रेड्डी आणि प्रमुख पाहुण्या डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम उपस्थित होत्या.मानसीने पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या बीएनसीए येथून आर्किटेक्चरची पदवी उत्कृष्ट गुणांसह पूर्ण केली आहे. उच्च शिक्षणासाठी आयआयटी हैदराबादमध्ये निवड झाल्यानंतर तिने सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एम.टेक.मध्ये हे यश संपादन केले. तळेगावातील जाधव ग्लासेसचे संस्थापक कै. पंढरीनाथ जाधव यांची मानसी नात तर उद्योजक विजय जाधव यांची ती कन्या आहे. मानसीची व्हीएनआयटी, नागपूर येथे पुढील उच्च शिक्षण व संशोधनासाठी निवड झाली असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तिच्या या यशाचे शिक्षक, जाधव कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांनी कौतुक केले आहे. तिची शैक्षणिक वाटचाल मावळातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page