नगरपरिषद प्रशासनाचा नियोजन शून्य सर्व कारभार पहिल्याच पाऊसात लोणावळ्यात सर्वकडे पाणीच फार





मावळ मराठा न्युज :- लोणावळा शहरात मंगळवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडाली. कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. यात नवीन होत असलेले हॉस्पिटल शेजारील यशवंतराव चव्हाण संकुल चा आत येण्या जाण्याचा रस्ता आणि समोरील इंदिरा नगर पूर्ण जलमय झाले. नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभाराचा कार्यलयात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला. लोणावळा नगरपरिषदेवर प्रशासक यांचे राज्य आहे. प्रशासनाचा नागरिकांशी संपर्क नसल्याने लोणावळ्यात पाऊसाचे प्रमाण जास्त असते हे माहित असून प्रशासनाने कोणतीही पाऊसाआधीची कामे केली नाहीत. दरवर्षी इंद्रायणी नदीवरील लाखो रुपये खर्च करून शेवाळे काढण्याचे कामाव्यतिरिक्त कोणतीहीपूर्व तयारी केली नसल्याने लोणावळ्यात अनेक सकल भागात घरात पाणी घुसण्याच्याघटना घडल्या आहेत. डेनकर कॉलनी येथे अनेक घरांमध्ये पाणी घुसले. या भागात एका बांधकाम व्यवसायकाने मोठ्या प्रमाणात भरणी करत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद केल्याने मागील तीन वर्षांपासून या भागात सातत्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून व निवेदने देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली . मात्र नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने यावर्षी पहिल्याच पावसात डेनकर कॉलनी मधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले अशी माहिती या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणारे सुभाष डेनकर मावळ मराठा न्युजशी बोलताना दिली.या विषयी बोलताना सुभाष डेनकर म्हणाले, पुरोहित बिल्डर यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भरणी करत पालिकेच्या गटारीवर भर टाकत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद केले आहेत. यामुळे दोन वर्षांपासून डेनकर कॉलनी मधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. पालिकाने त्यावेळी तात्पुरत्या उपाययोजना केल्या.त्यानंतर देखील पन्हा परोहित बिल्डरने या भागात नाले अरुंद करण्याचे व अडवण्याचे काम केल्याने डेनकर कॉलनी, जिजामाता नगर या भागातील पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यावर्षी लोणावळा शहरांमधील कालचा पहिलाच पाऊस व या पहिल्याच पावसामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक पाणी घुसल्याने नागरिकांचे देखील मोठे तारांबळ उडाली.याबाबत आम्ही वारंवार लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला भेटून सर्व परिस्थिती सांगितली आहे. तसेच लेखी निवेदने व त्या भागातील पूर्वीची परिस्थिती व आताची परिस्थिती याबाबतची छायाचित्रे देखील दिली आहेत. मात्र नगर रचना विभाग व बांधकाम विभाग यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोणावळा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ नागरिकांची ही समस्या सोडवावी. अन्यथा लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला लोणावळेकरांचा रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा सजग नागरिकांनी मावळ मराठा न्यूज शी बोलताना दिला.




