आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती निमित्त रथयात्रा आणि बाईक रॅली

मावळ मराठा न्युज – खोपोली – ११ एप्रिल थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९९ जयंती निमित्त आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने वर्ष ५ वे काढत असलेल्या रथयात्रा व बाईक रॅलीला समस्त खोपोलीकर सुरवातीपासून शेवट पर्यंत उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ( शिळफाटा ) इथे खोपोली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन हिरे, माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील, बांधकाम सभापती श्री. अनिल सानब, नगरसेविका सौ. सुवर्णा मोरे तसेच ज्येष्ठ पत्रकार समता सैनिक श्री. दिनकर भुजबळ साहेब, सौ. वर्षा मोरे नागरी सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष ह्यांनी पुष्पहार अर्पण करून नंतर आम्ही सर्वांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांचा विजय असो, जय ज्योती जय क्रांती अश्या घोषणा देऊन महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ रथयात्रेची व बाईक रॅलीची सुरवात केली. श्री प्रमोद गायकवाड व सौ. वर्षा मोरे ह्यांनी महात्मा फुले तसेच सावित्री फुले ह्यांची वेशभूषा प्रदान करून भूमिका साकारली. व खऱ्या अर्थाने त्याकाळात नेले. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले ह्यांच्या रथयात्रा तसेच बाईक रॅलीला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिळफाटा ते खोपोली बाजारपेठेतून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली पर्यंत रथयात्रा व बाईक रॅली काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा विजय असो अश्या घोषणा देऊन सांगता केली. माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील, बांधकाम सभापती अनिल सानब, नगरसेविका सुवर्णा मोरे व इतर ह्यांनी ही महात्मा फुले तसेच सावितीबाई फुले ह्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन त्यांच्या कार्याला उजाळा दिला. खोपोली पोलिस स्टेशन व खालापूर तहसील कार्यालय ह्यांनी परवानगी देऊन खूप मोठे सहकार्य केले. स्वतः श्री. सचिन हिरे ह्यांनी सहभाग घेऊन व इतर महिला व पुरुष पोलिस ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्या बद्दल ही त्यांचे अगदी मनापासून आभार .कु. रुत्वा प्रशांत संकपाळ ह्या ८ वर्षांच्या मुलीने महात्मा जोतिबा फुले ह्यांच्या बद्दल तिच्या शैलीत दिलेली माहिती ही उल्लेखनीय होती.श्री. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बद्दल बोलताना समता, बंधुता, जातीभेद ह्यातून बाहेर पडून मानवता हाच खरा धर्म आहे असे सांगितले. सो. वर्षा मोरे – महात्मा फुले जयंती निमित मनोगत व्यक्त करताना आज महात्मा फुले जयंती निमित्त सावित्रीबाई ह्यांचा किरदार आज साकारायला मिळाला व ज्या प्रमाणे इतर महापुरुषांची जयंती साजरी करता त्या प्रमाणे महात्मा फुले यांची जयंती सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी झाली पाहिजे असे सांगितले. व केलेल्या आव्हाला सर्व जण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. श्री. प्रमोद गायकवाड ह्यांनी ही महात्मा फुले जयंती निमित्त आज त्यांची भूमिका साकार करायला मिळाली त्या बद्दल आनंद व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. व माझे ही जीवन समाजासाठी उपयुक्त असावे व त्यांच्या प्रमाणे माझेही वर्तन असावे असे बोलून महात्मा फुले जयंतीच्या सर्वांना शुभेच्या दिल्या. श्री. महेश काजळे ह्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ज्यांना गुरु मानले तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची समाधी शोधून आपल्याला अवगत केले ते थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांच्या पूर्णाकृती पुतळा हा आपल्या खोपोली मध्ये नाही आहे. ज्याची मागणी व निवेदन ही मागे दिले आहे. याच बरोबर सावित्री बाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज व अहिल्याबाई होळकर ह्यांचा पुतळा व जागा ही सुचवली. ज्याला समस्त खोपोलीकर ह्यांचा नक्कीच पाठिंबा असेल व अशी मागणी माजी नगराध्यक्ष श्री. सुनील पाटील, ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल व इतर नगरसेवक व पदाधिकारी ह्यांच्या उपस्थिती मध्ये बांधकाम सभापती श्री. अनिल सानब, श्री. अमित फाळे, सौ. सुवर्णा मोरे, श्री. कैलास भाऊ गायकवाड ह्यांच्या समोर केली. बांधकाम सभापती श्री. अनिल सानब ह्यांनी ही तात्काळ नक्कीच मागणी योग्य असून कौन्सिल च्या वतीने ती पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. व येत्या कौन्सिल मध्ये हा विषय घेऊन सर्वानुमते मजूर करू असे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेल्यांची नावे न घेता समस्त खोपोलीकर महात्मा फुले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याबद्दल सर्वांचे महात्मा फुले समन्वय समिती तर्फे आभार. विशेष सहकार्य – शाहिद शफी शेख, इरफान शफी शेख – मिरवणूक साठी रथ

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page