लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोजच्या वतीने अनाथ व गरीब मुलासाठी वेट न जॉय ची आनंदाची सफर

मावळ मराठा न्युज – लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज अध्यक्ष पीएमजेएफ ला. सुरैया वाडीवाला डीसी इमेज बिल्डिंग एमजेएफ ला.अमीन वाडीवाला, ला. तबरेज वाडीवाला, सोमवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी मौला अली अनाथाश्रम-लोणावळा येथील ८ अनाथ मुले आणि एका गरीब कुटुंबातील २ लहान मुलांसाठी सहलीचे आयोजन केले. ही सहल वेट अँड जॉय वॉटर पार्कमध्ये ला. गिरीश भाई मालपाणी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती, ज्यांनी विशेष प्रयत्न करून आपल्या परीने सर्वोत्तम मदत केली. त्यासाठी गिरीश भाई यांचे खूप खूप आभार मानन्यात आले या सहलीचे प्रायोजक लोणावळा सुप्रीमो सदस्य ला.तबरेज वाडीवाला हे होते. मुलांना दुपारचे जेवण आणि चहापान देखील देण्यात आले. अनाथ मुलांनी या सहलीचा मनमुराद आनंद घेतला. वेट अँड जॉय येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत वॉटर पार्क आणि अम्युझमेंट पार्क या उदात्त कार्यासाठी टीम लोणावळा सुप्रीमोजला दिलेल्या तुमच्या अतुलनीय सहकार्याबद्दल गिरीश भाई मालपाणी यांचेमुळे चिमुकल्यांचा चेहऱ्यावर आनंद खुलला त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page