शिवदुर्ग टीमची तत्परता,ढाक भैरव बचाव मोहीम

मावळ मराठा न्युज:- मावळ,दिनांक २५/०३/२०२४,ढाक भैरव या ठिकाणी एक स्थानिक आदिवासी मुलगा (गाईड) ग्रुप घेऊन गेला होता व गाईडच पायऱ्यांवरुन तोल जाऊन पडला. दुपारी तीन वाजता अथर्व बेडेकर ठाणे यांनी प्रत्यक्ष अपघात होताना पाहिले होते. त्यांनी शिवदुर्ग रेस्कु ला फोन केला. तसेच MMRCC चै राहुल मेश्राम यांचाही कॉल आला. साहित्य आवरा आवर व टिम जमता जमता चार वाजले चार वाजता लोणावळ्यातून निघालो. पाच वाजता कोंडेश्वर मंदिर जवळ पोहोचलो सहा वाजता ढाक भैरव जवळ पोहोचलो. ८० -९० फुट उंचीवरुन पडल्यामुळे त्याला गंभीर मार लागला होता. डोक्यावर दोन खोल जखमा झाल्या होत्या. पाठीला , खांद्याला जबर मार होता. सचिन गायकवाड, दिव्येश मुनी , ओंकार पडवळ, यश सोनावणे, महेश मसने , हर्षल चौधरी, प्रथमोपचार केले व त्यांचे आई, वडीलही तिथे पोचलेले होते . रविंद्र होला वय वर्षे २४ सांडशी कर्जत या ठिकाणचा तो मुलगा राहणारा होता. कोणी ढाक भैरव कडे जाणारे पर्यटक असतील तर त्यांना गाईड म्हणून जाण्याचे काम पोटापाण्यासाठी करीत होता. आजही तो चार पर्यटकांना घेऊन गेला होताव असा हा अपघात झाला होता. आता प्रश्न होता कामशेत च्या दिशेने घेऊन जायचे कि खाली कर्जतकडे सांडशी गावात उतरायचे. खाली जवळच आमची वाडी आहे त्यामुळे कामशेतकडे नेऊ नका असे आई वडीलांचे म्हणणे होते . आम्ही जास्त आढेवेढे न घेता तयार झालो आमची वाहने कोडेश्वरला पार्क केलेली होती. आम्ही दोन टिम केल्या एक रविंद्रला घेऊन खाली जाईल यामध्ये सचिन गायकवाड, ओंकार पडवळ, रतन सिंग, राजेंद्र कडु, महेश मसने, यश सोनवणे, हर्षल चौधरी ,सुनिल गायकवाड व दुसरी पिढी साहित्य घेऊन गाडीकडे जाऊन कर्जत कडे आम्हाला घ्यायला येईल. या मध्ये दिव्येश मुनी सर, अभिजित बोरकर, यश चिकणे, प्रिंस बैठा, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, प्रणय बढेकर वमेहबूब मुजावर आणि ठरल्याप्रमाणे एक टिम खाली व एक टिम परत कोडेश्वरकडे निघाली .संध्याकाळचे सात वाजले होते रविंद्र बोलत होता, उठून चालण्याची तयारी दाखवत होता. काहि पाऊले तो चाललाही पण त्याला मार लागला होता त्यामुळे वेदनाही होत होत्या. चालताना लडखडत होता मग आम्ही स्ट्रेचर चा निर्णय घेतला व जेवढे शक्य होईल तेवढे लवकर खाली आणायचा प्रयत्न केला. खाली उतरताना अतीतिव्र उतारा मुळे व जिवंत व्यक्ती प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो . अंतरही मोठे होते टिमची दमछाक होत होती गावात बातमी गेली होती पण होळीच्या सणामुळे तरुण मूले व्यस्त होते.‌पण जसे जसे त्यांना समजले तसे तसे ते मदतीसाठी आले ठाण्यातील अथर्व बेडेकर बरोबर आलेले सात ट्रेकर्स सुध्दा मदतीसाठी थांबले होते. परंतु रविंद्र ज्यांना घेऊन आला होता ते कधी निघून गेले समजले सुध्दा नाही.मदतीला थांबले नाहीत. थोडीही माणुसकी त्यांनी दाखवली नाही. संपूर्ण तिव्र उतारावर चालणे व जखमी व्यक्तीला घेऊन जाणे खुपच अवघड जात होते. खडतर मार्ग पार करून रात्री साडे दहा वाजता खाली सांडशी वाडी येथे पोचलो ॲम्बूलन्स आधीच पोचलेली होती व थोडाही वेळ न दवडता आम्ही रविंद्र ला MGM हॉस्पिटलकडे रवाना केले. आम्हाला घ्यायला येणाऱ्या गाड्याही जवळपास आल्या होत्या. काम संपले होते आता प्रणय अंबुरे व अभिजीत बोरकर हे गाड्या घेऊन पोचले व आम्ही परत लोणावळ्याकडे निघालो.भैरवनाथाची कृपा म्हणून एवढ्या उंचीवरुन पडूनही त्याचा जीव वाचला होता.आजची टिम दिव्येश मुनी,सचिन गायकवाड,ओंकार पडवळ,अभिजित बोरकर,रतन सिंगराजेंद्र कडु,महेश मसने,यश चिकणे,यश सोनवणे,प्रिंस बैठा,हर्षल चौधरी, चंद्रकांत बोंबले,अनिल आंद्रे,प्रणय बढेकर,मेहबूब मुजावर,सुनिल गायकवाड,कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व गणेश तावरे , पोलीस पाटील,बाळासाहेब पवार यांचे सहकार्य लाभले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page