लोणावळा नगरपरिषद,जिल्हा पुणे करीता नगर पथविक्रेता समिती स्थापन




मावळ मराठा न्युज- लोणावळा,राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय खात्याकडून राजपत्र नुकतेच जारी करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेच्या पथविक्रेत्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय,पथविक्रेते,अशासकीय संघटना,पणन संघ,आणि शहरातील अग्रणी बॅंक या प्राधिकृत संस्थांच्या प्रतिनिधींची एक समिती गठीत करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्या शहराचे पर्यटन म्हणून महत्व असल्याने पथविक्रिची जागा, अधिकृत विक्रेते,कायदेशीर प्रक्रिया,शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आणि लोणावळा शहराचे विद्रुपिकरण होणार नाही यासाठी हीं समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीवर मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद,अध्यक्ष असतील पोलीस ठाण्याचे अधिकारी,स्थानिक प्रभारी वाहतूक पोलीस अधिकारी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी,विशेष नियोजन प्राधिकरणाचा प्रतिनिधी,पथ विक्रेत्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. अशोक राम कदम, श्री. धनराज गुलाब लांघे, श्री. आकाश दशरथ परदेशी श्रीमती मुस्कान लतीफ शेख, श्रीमती सुजाता रमेश म्हाळसकर, श्रीमती निर्मला वसंत पांगारे, श्री. गणेश गोपाळ चव्हाण, श्री. संदीप लक्ष्मण पोटफोडे सदस्य म्हणून असतील तर अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटनांचे प्रतिनिधी म्हणून श्री. प्रफुल्ल मोहन काकडे श्री. नरेश तुकाराम खोंडगे,आणि पणन संघाचा प्रतिनिधी म्हणून श्री. हर्शल भिमाजी होगले यांची तर जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक समितीच्या सदस्य असणार आहे.अशा प्रकारची अधिसूचना २३ एप्रिल २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आली आहे.या समितीवर लोणावळा नगरपरिषदेची भूमिका महत्वाची असणार आहे.




