संजय कडू यांच्या झेप मल्टीमिडियाला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख,भव्य सत्कार सोहळ्यात पारंपरिक बोन सेटिंग प्रशिक्षणार्थींचा गौरव

मावळ मराठा न्यूज़ नेटवर्क -दि. १५ एप्रिल २०२६ रोजी पंढरपूर येथील जोगदंड महाराज मठ येथे पारंपरिक बोन सेटिंग थेरपी प्रशिक्षणार्थींचा राज्यव्यापी भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा Zep Multimedia Private Limited अंतर्गत कार्यरत झेप मल्टीमीडिया अल्टरनेटिव्ह इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय कडू यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.पारंपरिक उपचारपद्धतीला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमाने अवघ्या एका वर्षात तब्बल ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत उल्लेखनीय यश संपादन केले. या विक्रमी कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेत London Book of World Records यांनी संजय कडू यांना गौरविले. त्यामुळे संस्थेच्या कार्याला जागतिक ओळख मिळाली आहे.या भव्य सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी संप्रदायाचे मृदंगाचार्य ह.भ.प. जोगदंड महाराज, ह.भ.प. सेवकरामदादा मिलमिले महाराज, वनस्पती शास्त्रज्ञ व संशोधक डॉ. प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या राज्याध्यक्षा सौ. ज्योतीताई शेटे तसेच आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील गाडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील ननवरे यांनी केले. संजय कडू यांच्या झेप मल्टीमिडियाला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख,भव्य सत्कार सोहळ्यात पारंपरिक बोन सेटिंग प्रशिक्षणार्थींचा गौरव डॉ. स्वातीताई मसुरकर व डॉ. फिरदोस तिरंदाज यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट, सन्मानपत्र, ट्रॉफी व मेडल प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी व मान्यवर उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेबद्दल आणि संजय कडू यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या काळात ड्रगलेस व नॉन-इन्वेसिव्ह उपचारपद्धतींची देशाला मोठी गरज आहे. कायरोथेरपी आणि पारंपरिक बोन सेटिंगसारख्या कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आरोग्यसेवेचे नवे पर्याय उपलब्ध होत आहेत.या विक्रमी यशामुळे झेप मल्टीमीडिया अल्टरनेटिव्ह इन्स्टिट्यूटने केवळ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले नाही, तर भारताच्या पारंपरिक आरोग्यज्ञानाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. भविष्यात आणखी विविध अल्टरनेटिव्ह हेल्थकेअर कोर्सेस सुरू करून अधिकाधिक प्रशिक्षित तज्ज्ञ घडविण्याचा संस्थेचा मानस आहे.हा सोहळा केवळ सत्कार समारंभ नव्हता, तर पारंपरिक आरोग्यसेवा क्षेत्रातील नव्या युगाची प्रेरणादायी सुरुवात ठरला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page