सत्यसाई कार्तीक यांची पवनानगर येथे दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई मध्ये जुगाराचे साधनासह एकूण ७ लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त


मावळ मराठा न्युज :- पवनानगर,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथे दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई कारवाई मध्ये जुगाराचे साधनासह एकूण ७ लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्तलोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पवनानगर येथील एका खाजगी घरामध्ये व पोल्ट्री फॉर्ममधे अशा दोन ठिकाणी तीन पत्ती नावाचा पत्यांचा जुगार अड्डा चालु आहे . त्यावरून सहा पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी आज दिनांक २५/१२/२०२३ रोजी त्यांचे कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पवनानागर येथे १) दुर्गा माता मंदिराचे शेजारी एका बंद पत्र्याचे शेडमध्ये व २) एम्पायर हॉटेलचे पाठीमागे, काले गावच्या हद्दीमध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये असे दोन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात एकूण १५ इसम हे तीन पत्ती पत्यांचा जुगार खेळताना मिळून आले. सदरच्या कारवाईत रोखरक्कम व अन्य मुद्देमाल असा एकूण रू ७ ,०५ ,००० /- (अक्षरी रुपये सात लाख पाच हजार रू.) किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा सागर बनसोडे, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोहवा/सचिन गायकवाड, पोकॉ रईस मुलानी, सिद्धेश वाघमारे व लोणावळा ग्रामीण स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.




