सरकार अद्यापही यु ट्युबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही हे चुकीचे- एस एम देशमुख

मावळ मराठा न्युज -संभाजीनगर,महाराष्ट्राची ऐतिहासिक नगरीं असलेल्या संभाजीनगर नगर येथे संत एकनाथ रंगमंदिर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे च्या राज्यस्तरीय डिजिटल मीडियाचे पहिले मार्गदर्शन शिबीर पत्रकारांचे आधार स्तंभ असलेल्या परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी यूट्यूब चॅनल आणि न्यूज पोर्टल चें पत्रकार यांच्यापुढील समस्यांचा उहापोह करण्यात आला. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात एस. एम. देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. सरकार अद्यापही यु ट्युबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही. पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार चाल ढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्षे झाली. तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही. पत्रकारांच्या पेन्शनचे, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.अशी डिजिटल मीडिया च्या पत्रकारांसाठी आम्ही मोठ्या ताकतीने त्यांच्या पाठीशी आहोत.असा विश्वास या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकार यांना दिला.अश्या डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार यांच्या अडचणी त्यांना भांडवलदार पत्रकार ज्या नजरने पाहतात ते चुकीचे आहे असेही देशमुख यांनी सांगितले.त्यांना इतर पत्रकारांसारखाच सन्मान मिळाला पाहिजे यासाठी घेतलेले हे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होते. यात विश्वस्त शरद पाबळे,आष्टीवकर आदी आम्ही झटत आहोत त्यामुळे आपल्याला पूर्ण ताकतीने संघटित होणे महत्वाचे आहे असेही एस एम देशमुख यांनी सांगितले.माजी मंत्री भागवत कराड यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले.अधिवेशनाचे प्रास्ताविक बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रकाश भगनुरे यांनी मानले. या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल, नागेश गजभिये, स.सो. खंडाळकर, डॉ, धनंजय लांबे, डॉ. मोहम्मद अब्दुल कदीर, जगन्नाथ सुपेकर, रमेश खोत, यांचा पत्रकारितेतील दीर्घ सेवेबद्दल स. सतर्क महाराष्ट्र क करण्यात आला. या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यु ट्युब चॅनेल व पोर्टलच्या पत्रकार व संपादकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page