भगवान श्री अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणावळा या संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; १५% लाभांश जाहीर

मावळ मराठा न्युज – लोणावळा,भगवान श्री अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणावळा या संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी संस्थेच्या क्यू आर कोड चे उद्घाटन लोणावळा शहराचे प्रथम नागरिक, नगराध्यक्ष व पतसंस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री. राजेंद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी संस्थेमध्ये नियमित व्यवहार करणाऱ्या तसेच वेळचे वेळी कर्जाचे हप्ते भरणाऱ्या सभासदांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.भगवान श्री अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणावळा यांचे वतीने यावर्षी देखील सभासदांना १५% लाभांश जाहीर करण्यात आला.या २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेला मोठ्या संख्येने सभासदांनी आपली उपस्थिती लावली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page